सार्वजनिक वित्त, राजकोषीय धोरण आणि कर रचना
India
Abstract
आधुनिक काळात सार्वजनिक म्हणजे सरकारी खर्च व उत्पन्न प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे त्यांचे स्वतंत्र शास्त्र हृदयास आले त्या शास्त्राला सार्वजनिक वित्त असे म्हणतात सरकारच्या वित्तीय व्यवहाराचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक वित्त होय सार्वजनिक वित्त मध्ये सरकारचे उत्पन्न व सरकारच्या खर्चाचा समावेश होतो सरकारचे कर रचना करेत्तर महसूल प्राप्ती सार्वजनिक खर्च सार्वजनिक कर्ज अर्थसंकल्प वित्तीय तूट आणि केंद्र राज्य आर्थिक संबंध इत्यादीचा अभ्यास सार्वजनिक वित्त यामध्ये केला जातो. सरकार आपले राजकोषीय धोरण आपल्या जमाखर्चाचे वार्षिक विवरण पत्रक मांडून जाहीर करते अशा वार्षिक विवरण पत्राला सरकारचा अर्थसंकल्प असे म्हणतात राजकोषीय धोरणाचा मुख्य उद्देश म्हणजे रोजगार निर्मिती करणे किंमत स्थैर्य राखणे उत्पन्नाचे पुनर्वितरण करणे आणि सामाजिक कल्याण राखणे हा आहे. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये करव्यवस्था ही सार्वजनिक महसूल प्राप्तीचा महत्त्वाचा स्त्रोत आहे यामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कराचा समावेश होतो जीएसटी (GST) Goods and service tax यांनी कर रचनेत महत्त्वाचे बदल घडून आणले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक भांडवली खर्च, पायाभूत सुविधा ,आरोग्य शिक्षण ,सामाजिक सुरक्षा, कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान यांना विकास प्रक्रियेत विशेष महत्त्व प्राप्त होते. बजेट 2026 27 मध्ये केंद्र सरकारने 44.04 लाख कोटी इतका gross tax revenue अंदाजीत केला असून तो revised estimate 2025-26 पेक्षा आठ टक्के अधिक आहे. यामध्ये प्रत्यक्ष कर 26.07 लाख कोटी आणि अप्रत्यक्ष कर 17.01 लाख कोटी असा अंदाज आहे. केंद्राचा fiscal deficit FY 2026-27 मध्ये GDP च्या 43% इतका अंदाजीत करण्यात आला आहे. प्रस्तुत संशोधन लेखांमध्ये सार्वजनिक वित्ताची संकल्पना, राजकोषीय धोरणाची उद्दिष्टे व साधने, भारतीय करव्यवस्था, जीएसटी ,सार्वजनिक खर्च ,वित्तीय तूट, सार्वजनिक कर्ज, केंद्र राज्य आर्थिक संबंध ,आणि वित्तीय शाश्वतता यांचा अभ्यास करण्यात आला आहे.
Keywords
How to Cite This Article
Rights
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE