भारतीय कृषी क्षेत्र, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी परिवर्तनाचे अध्ययन :२०११-१२ ते २०२५-२६
India
Abstract
भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये कृषी क्षेत्र, ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कृषी-सामाजिक संरचनेतील परिवर्तनाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. भारतातील मोठ्या लोकसंख्येची उपजीविका प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कृषी आणि संबंधित क्षेत्रांवर अवलंबून आहे. आर्थिक वाढीच्या प्रक्रियेत उद्योग व सेवा क्षेत्रांचा वाटा वाढत असला, तरी मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येची उपजीविका शेती आणि शेतीशी संबंधित कामांवर अवलंबून आहे. २०११ ते २०२६ या कालावधीत भारतीय कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण, डिजिटल तंत्रज्ञान, सिंचन सुविधा, कृषी कर्ज, पीक विमा आणि बाजारपेठेतील बदल यांमुळे अनेक परिवर्तन घडून आले आहे. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न, उत्पादन खर्च वाढ, हवामान बदल, अनियमित पर्जन्यमान आणि ग्रामीण रोजगारातील अस्थिरता ही आव्हाने कायम आहेत. तंत्रज्ञानाचा वेगवान विकास, हवामान बदल, बाजारव्यवस्थेतील सुधारणा आणि धोरणात्मक हस्तक्षेप यांमुळे कृषी क्षेत्राची रचना, कार्यपद्धती आणि उद्दिष्टे बदलली आहेत. भारतातील कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेने पारंपरिक जीवनपद्धतीकडून आधुनिक, तंत्रज्ञान आणि व्यावसायिक बाजारपेठेच्या दिशेने एक मोठा रचनात्मक बदल अनुभवला आहे. शेती ही केवळ अन्नधान्य उत्पादनाची क्रिया नसून रोजगार, ग्रामीण मागणी, कच्चा माल, अन्नसुरक्षा, पर्यावरणीय संतुलन आणि सामाजिक संबंध यांना आकार देणारी व्यापक व्यवस्था आहे. जागतिक स्तरावर प्रिसिजन शेती, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान, हवामान, स्मार्ट कृषी पद्धतींमुळे उत्पादनक्षमता वाढलेली आहे. प्रस्तुत अध्ययन भारतीय कृषी परिवर्तनाचा सखोल अभ्यास करतो व त्याचा ग्रामीण विकासावर होणारा सामाजिक व आर्थिक परिणाम स्पष्ट करतो. उत्पन्नवाढ, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण सशक्तीकरण या संदर्भात कृषी परिवर्तनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. प्रस्तुत संशोधनाचा उद्दिष्ट हे भारतीय कृषी क्षेत्रातील उत्पादकता, शेतकरी उत्पन्न, शासकीय योजनांचा प्रभाव, ग्रामीण रोजगार आणि शाश्वत शेती यांचा उपलब्ध दुय्यम माहितीव सांखिकीच्या आधारे अभ्यास करणे हा आहे. कृषी विकास समावेशक, तंत्रज्ञानाधारित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना व शिफारशी दिलेल्या आहेत.
Keywords
How to Cite This Article
Rights
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE