ऊसतोडणी कामगारांचे हंगामी स्थलांतर आणि सामाजिक परिवर्तन : एक समाजशास्त्रीय अध्ययन
India
Abstract
भारतीय समाजात स्थलांतर हे होत असते. व स्थलांतर ही लोकसंख्यात्मक, सामाजिक आणि आर्थिक बदलांशी निगडित प्रक्रिया आहे. म्हणून महाराष्ट्रातील ऊसतोडणी उद्योगासाठी दरवर्षी अनेक ग्रामीण कामगार हंगामी स्वरूपात स्थलांतर करतात. शेतीतील अनिश्चितता, स्थानिक रोजगाराच्या मर्यादा, आर्थिक गरजा, कर्ज आणि सामाजिक जाळे हे या स्थलांतराशी संबंधित घटक असू शकतात. ऊसतोडणीचे काम प्रामुख्याने श्रमप्रधान असून श्रमाला जास्त महत्त्व आहे. अनेक ठिकाणी पती-पत्नी किंवा कुटुंबातील सदस्य एकत्रितपणे काम करतात. स्थलांतरामुळे उत्पन्नाची संधी उपलब्ध होत असली तरी स्वच्छता,निवास,पाणी,मुलांचे शिक्षण,आरोग्य कामाच्या अटी आणि सामाजिक सुरक्षेचे प्रश्नही निर्माण होतात. प्रस्तुत लेखाचा उद्देश म्हणजे ऊसतोडणी कामगारांच्या हंगामी स्थलांतराची कारणे आणि त्याचे सामाजिक-आर्थिक परिणाम समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेणे हा आहे. हा लेख दुय्यम साहित्यावर आधारित वर्णनात्मक व विश्लेषणात्मक स्वरूपाचा आहे; प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षणाचे निष्कर्ष येथे मांडलेले नाहीत. म्हणजे प्रत्यक्ष सर्वेक्षण केलेले नाही आहे.स्थलांतराकडे केवळ कामगारांच्या हालचाली म्हणून न पाहता ग्रामीण विषमता, लिंगाधारित श्रमविभाजन, कुटुंबव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तनाशी जोडून पाहण्याची गरज लेखातून अधोरेखित केली आहे. स्थलांतराची गरज, रोजगाराचा प्रश्न, इत्यादी या लेखातून अधोरेखित करण्याची गरज वाटली.
Keywords
How to Cite This Article
Rights
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE