editor@bjddjournal.org +91 8600071634, +91 98903 82132
Open-Access, Transparent Peer-Reviewed, Refereed

BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE

ISSN: 3139-1486 (Online) | ISSN: 3139-9819 (Print) Impact Factor : 6.21 ESTD Year : 2025
Bi-monthly Multilingual Academic Research Multidisciplinary

*** Important Announcement: Call for Papers! Submissions are now open for the upcoming issue. Please visit the "Submit Paper" section to learn more. ***
← Back to Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development"

पश्चिम विदर्भातील फेरीवाले व सूक्ष्म व्यापार्‍यांमध्ये डिजिटल देयके स्वीकारण्यातील आर्थिक साक्षरतेची भूमिका: एक अनुभवजन्य अभ्यास

India

Abstract

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये विमुद्रीकरण (२०१६) आणि कोविड-१९ नंतरच्या काळात डिजिटल वित्तीय प्रणालीचा वेगाने विस्तार झाला आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) मुळे देशात रिटेल पेमेंट क्रांती घडून आली असली, तरी प्रादेशिक पातळीवर या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अवलंब सर्व घटकांमध्ये समान झालेला नाही. विशेषतः पश्चिम विदर्भातील (अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम) असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म व्यावसायिक, छोटे दुकानदार आणि पथविक्रेते यांच्यासाठी डिजिटल व्यवहार स्वीकारणे हा केवळ तांत्रिक सुविधेचा भाग नसून त्यांच्या वित्तीय व डिजिटल साक्षरतेवर अवलंबून असलेला एक संवेदनशील निर्णय आहे. प्रस्तुत शोधनिबंध पश्चिम विदर्भातील २०० पथविक्रेते आणि सूक्ष्म व्यावसायिकांच्या प्राथमिक सर्वेक्षणावर आधारित आहे. या अभ्यासाचा मुख्य उद्देश सूक्ष्म व्यावसायिकांमधील वित्तीय साक्षरता आणि डिजिटल देयक प्रणाली स्वीकारणे यांमधील प्रत्यक्ष कार्यकारण संबंध अभ्यासणे हा आहे. अभ्यासात असे दिसून आले की, स्मार्टफोनची उपलब्धता आणि मूलभूत बँक खाते असूनही, सायबर सुरक्षेची भीती, सर्व्हर डाऊन होण्यामुळे होणारे नुकसान, खात्यातील पैशांचे चुकीचे हस्तांतरण आणि डिजिटल फसवणुकीविषयी अपुरी माहिती यामुळे अनेक व्यापारी केवळ रोख (Cash) व्यवहारांवरच जास्त भर देतात. तंत्रज्ञान स्वीकृती प्रारूप (Technology Acceptance Model - TAM) च्या चौकटीत हा अभ्यास वित्तीय साक्षरतेचा प्रभाव तपासतो. निष्कर्षांवरून हे स्पष्ट होते की केवळ QR कोड वाटप करून चालणार नाही, तर स्थानिक भाषेत सायबर-वित्तीय साक्षरता शिबिरे, विनाविलंब तक्रार निवारण यंत्रणा आणि विश्वासार्ह डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे काळाची गरज आहे.

Keywords

वित्तीय साक्षरता डिजिटल पेमेंट्सपथविक्रेतेसूक्ष्म उद्योगपश्चिम विदर्भवित्तीय समावेशनतंत्रज्ञान स्वीकृती प्रारूप.

How to Cite This Article

नंदु भैय्यालाल मावस्कर. (2026). पश्चिम विदर्भातील फेरीवाले व सूक्ष्म व्यापार्‍यांमध्ये डिजिटल देयके स्वीकारण्यातील आर्थिक साक्षरतेची भूमिका: एक अनुभवजन्य अभ्यास. Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development".

Rights

Copyright
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE