भारतीय अर्थव्यवस्थेतील डिजिटल परिवर्तन आणि वित्तीय समावेशन सर्वसमावेशक विकासाच्या संदर्भातील चिकित्सक अभ्यास
India
Abstract
भारतीय अर्थव्यवस्थेत गेल्या दशकात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढला आहे. डिजिटल बँकिंग, मोबाईल बँकिंग, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI), डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि वित्तीय तंत्रज्ञानामुळे आर्थिक व्यवहारांची पद्धत बदलली आहे. या परिवर्तनामुळे वित्तीय सेवांचा प्रवेश विस्तारण्यास, व्यवहार सुलभ करण्यास आणि औपचारिक वित्तीय व्यवस्थेशी नागरिकांना जोडण्यास नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. तथापि, डिजिटल परिवर्तनाचा लाभ सर्व सामाजिक व आर्थिक घटकांना समान प्रमाणात मिळतोच असे नाही. डिजिटल दरी, इंटरनेट व उपकरणांची असमान उपलब्धता, डिजिटल व आर्थिक साक्षरतेचा अभाव आणि सायबर सुरक्षेची आव्हाने यामुळे सर्वसमावेशक डिजिटल विकासास मर्यादा येऊ शकतात. प्रस्तुत संशोधनाचा उद्देश भारतीय अर्थव्यवस्थेतील डिजिटल परिवर्तन आणि वित्तीय समावेशन यांचा परस्परसंबंध स्पष्ट करणे तसेच सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने त्यातील संधी व आव्हानांचे चिकित्सक विश्लेषण करणे हा आहे. हा अभ्यास वर्णनात्मक व विश्लेषणात्मक स्वरूपाचा असून दुय्यम माहितीवर आधारित आहे. भारतीय रिझर्व्ह बँक, NPCI, जागतिक बँक आणि भारत सरकारच्या उपलब्ध अधिकृत अहवालांचा तसेच संबंधित संशोधन साहित्याचा उपयोग करण्यात आला आहे. अभ्यासातून असे दिसून येते की डिजिटल वित्तीय सेवांनी आर्थिक व्यवहारांची पोहोच आणि सुविधा वाढविण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मात्र डिजिटल प्रवेशाबरोबर डिजिटल कौशल्य, सुरक्षितता आणि आर्थिक साक्षरता यांचा विकास आवश्यक आहे. म्हणून डिजिटल परिवर्तनाला केवळ तांत्रिक बदल न मानता आर्थिक समावेशन आणि सर्वसमावेशक विकासाच्या व्यापक चौकटीत पाहणे आवश्यक आहे.
How to Cite This Article
Rights
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE