editor@bjddjournal.org +91 8600071634, +91 98903 82132
Open-Access, Transparent Peer-Reviewed, Refereed

BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE

ISSN: 3139-1486 (Online) | ISSN: 3139-9819 (Print) Impact Factor : 6.21 ESTD Year : 2025
Bi-monthly Multilingual Academic Research Multidisciplinary

*** Important Announcement: Call for Papers! Submissions are now open for the upcoming issue. Please visit the "Submit Paper" section to learn more. ***
← Back to Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development"

अमरावती जिल्ह्यातील कृषी विकास व कृषी उत्पादनवाढीसाठी सिंचन योजनांचे योगदान : एक चिकित्सक अध्ययन

India

Abstract

अमरावती जिल्ह्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर अवलंबून असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेवर पर्जन्यमान, पाण्याची उपलब्धता, सिंचन सुविधा, मृदा, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठ या घटकांचा प्रभाव पडतो. अमरावती जिल्ह्यातील शेतीचा मोठा भाग पावसावर अवलंबून असल्यामुळे अनियमित पर्जन्यमान, पावसातील खंड, अवर्षणसदृश परिस्थिती आणि हवामानातील बदल यांचा कृषी उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे कृषी विकासासाठी सिंचन सुविधांचा विस्तार आणि जलव्यवस्थापनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध सिंचन, जलसंधारण, सूक्ष्म सिंचन आणि शेततळे योजनांमुळे शेतीला संरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यास मदत झाली आहे. अमरावती जिल्ह्यात अप्पर वर्धा, शहानूर, पूर्णा, चंद्रभागा आणि शेकदरी यांसारखे सिंचन प्रकल्प तसेच विहिरी, शेततळे, ठिबक व तुषार सिंचन यांसारख्या स्थानिक जलस्रोतांचा कृषी क्षेत्राला लाभ होत आहे. जिल्ह्याच्या ईशान्य भागात विशेषतः संत्रा उत्पादनासाठी सिंचन क्रियाकलाप मोठ्या प्रमाणात असल्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या माहितीत नमूद आहे. प्रस्तुत अभ्यासात सिंचन योजनांमुळे पिकांचे उत्पादन, पीक पद्धती, पीक तीव्रता, शेतकऱ्यांचे उत्पन्न, बागायती क्षेत्र, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषी जोखीम यांवर झालेल्या परिणामांचा चिकित्सक अभ्यास करण्यात येतो. तसेच योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी, निधीचा वापर, लाभार्थ्यांपर्यंत पोहोच, पाण्याचे असमान वितरण आणि जलस्रोतांच्या शाश्वत वापराची गरज यांचाही विचार करण्यात आला आहे.

How to Cite This Article

विक्रम सज्जन चक्रे. (2026). अमरावती जिल्ह्यातील कृषी विकास व कृषी उत्पादनवाढीसाठी सिंचन योजनांचे योगदान : एक चिकित्सक अध्ययन. Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development".

Rights

Copyright
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE