जिगाव प्रकल्पामुळे भूसंपादित आणि विस्थापित शेतकऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीचे अध्ययन
India
Abstract
यामध्ये प्रामुख्याने जिगाव प्रकल्पाचा थोडक्यात अभ्यास करण्यात आलेला आहे प्रकल्पाची सुरुवात केव्हा झाली या प्रकल्पा अंतर्गत किती टक्के शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या या धरणाची लांबी उंची तसेच या प्रकल्पा अंतर्गत किती जिल्ह्यांना व गावांना लाभ मिळणार आहे तसेच पाणीटंचाईवर कशा पद्धतीने मात करता येईल आणि संपूर्ण शेती ओलिताखाली कशा पद्धतीने आणता येईल याचा अभ्यास करण्यात आलेला आहे. तसेच या प्रकल्पामुळे ज्या शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीचे संपादन करण्यात आलेले आहे त्या शेतकऱ्यांना नेमक्या कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे याचा सुद्धा अभ्यास करण्यात आलेला आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी वर्गाच्या सामाजिक व आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तसेच या प्रकल्पाचे काम पाहिजे तसे पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही जसे की जिगाव प्रकल्पाच्या भितींचे सुरू असलेले काम.जिगाव प्रकल्पाच्या भितींचे सुरू असलेले काम. जिगाव प्रकल्पाचे काम पूर्ण होणार तरी कधी महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाचे लाभक्षेत्र पाटचारी ऐवजी पाइपलाइनद्वारा भिजवल्या जाईल हे अभिनंदनीय आहे. मात्र या सोबतच सूक्ष्मसिंचनाची सोय होईल अशी मागणी मान्य करण्याची गरज आहे. या प्रकल्पाची वितरण प्रणाली सौर ऊर्जेवर चालणारी राबवावी तसेच पाण्याचा योग्य वापर होऊन हरितक्रांतीचे स्वप्न पूर्णत्वास जाऊ शकेल. बुलडाणा वऱ्हाडातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बघितल्या जाणाऱ्या जिगाव प्रकल्पाचे काम वर्षानुवर्षे संथगतिने होत असल्याने या प्रकल्पाच्या खर्चात दरवर्षी हजारो कोटींची वाढ होत आहे. २००५ नंतर काम सुरू झालेला हा प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेला नसून पूर्ण होण्यासाठी आणखी किती वर्ष लागतील, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा तालुक्यात पूर्णा नदीवर जिगाव प्रकल्प साकारत आहे. वर्षानुवर्षे प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांसोबत संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच कंत्राटदार व अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाच्या कामाला प्रारंभ होत आहे. निधीअभावी रखडलेल्या प्रकल्पांची कामे आत्ता शासनाच्या बळिराजा जलसंजीवनी योजनेतून केली जाणार आहेत. त्याचा फायदा जिगावलाही होऊ शकतो. जिगाव सिंचन प्रकल्पाचे काम गेल्या २० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून संथगतीने होत आहे. ते अद्यापही पूर्णत्वास जाऊ शकलेले नाही. या प्रकल्पाला प्रथम प्रशासकीय मान्यता ३ जानेवारी १९९६ रोजी तर सुधारित मान्यता २० ऑक्टोबर २००५ रोजी मिळाली होती. त्या वेळी हा प्रकल्प १२२०.४८ कोटींचा होता. द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता २४ जून २००९ मध्ये घेण्यात आली, त्या वेळी या प्रकल्पाची किंमत ४०४४.१३ कोटींवर पोचली. प्रकल्पाच्या किमतीत त्यावेळेसपासून सातत्याने वाढच होत गेली. परंतु कामाची गती मात्र या तुलनेत वाढली नाही. मागील २० वर्षांच्या काळात केवळ ३६ टक्के काम झाले होते. तर त्यानंतरच्या दोन वर्षात केवळ १४ टक्के काम झाले. सुमारे बावीस वर्षांत हा प्रकल्प ६० टक्यांपर्यंत पोचू शकलेला नाही. उर्वरित काम होण्यासाठी आणखी किती वर्षे लागतील, असा प्रश्न विचारल्या जात आहे. गेल्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव जामोद तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये या प्रकल्पाला गती मिळावी म्हणून प्रकल्पाचा ‘वाॅररूम’मध्ये समावेश केला. त्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला बऱ्यापैकी गतिही मिळाली. असा आहे प्रकल्प जिगाव सिंचन प्रकल्पाची लांबी आठ हजार २४० मीटर असून प्रकल्पात द्वारमुक्त जलोत्सारणी असून १५ बाय १२ मीटरचे १६ वक्रदरवाजे आहेत. या प्रकल्पाच्या कक्षेत बुलडाणा जिल्ह्यातील २६८ व अकोला जिल्ह्यातील १९ अशा २८७ गावांतील ८४ हजार २४० हेक्टर शेती हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर सिंचनाखाली येऊ शकणार आहे. या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात ३२ गावे पूर्णत: व १५ गावे अंशत: असे एकूण ४७ गावे बाधीत झाली आहेत. बाधीत गावांपैकी खरकुंडी, खोदखेड, गौलखेड, पलसोडा, टाकळी वतपाळ, जिगाव, कालवड, हिंगणा अशा सात गावांची जमीन पूर्णत: संपादित होऊन सरकारने ताब्यात घेतली. दरवर्षी या प्रकल्पाची किंमतीत हजारो कोटींची वाढ होत आहे. अशा पद्धतीने जिगाव प्रकल्पामध्ये दिरंगाई होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते
How to Cite This Article
Rights
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE