गरिबी, विषमता आणि सर्वसर्वसमावेशक विकास: महाराष्ट्र आणि खान्देश संदर्भातील आव्हाने व संधी
India
Abstract
गरिबी, आर्थिक विषमता आणि सर्वसमावेशक विकास हे भारताच्या आर्थिक विकास प्रक्रियेतील परस्परांशी संबंधित महत्त्वाचे घटक आहेत. भारताने आर्थिक वाढ, पायाभूत सुविधा, सामाजिक सुरक्षा, वित्तीय समावेशन, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेमध्ये लक्षणीय प्रगती केली असली तरी विकासाचे लाभ सर्व सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक घटकांपर्यंत समान प्रमाणात पोहोचलेले नाहीत. विशेषतः ग्रामीण भाग, अनुसूचित जाती-जमाती, महिला, भूमिहीन कामगार, स्थलांतरित कामगार आणि विदर्भासारख्या प्रादेशिकदृष्ट्या मागास भागांना अनेक प्रकारच्या वंचिततेचा सामना करावा लागतो. गरिबीचे मापन केवळ उत्पन्न किंवा उपभोगाच्या आधारे न करता आरोग्य, शिक्षण, पोषण, निवास, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज, स्वयंपाकाचे इंधन आणि बँक खाते यांसारख्या विविध आयामांच्या आधारे करणे आवश्यक आहे. नीती आयोगाच्या राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांकानुसार, भारतातील बहुआयामी गरिबीचे प्रमाण सातत्याने घटत असून ते 2015-16 मधील 24.85 टक्क्यांवरून 2019-21 मध्ये 14.96 टक्के आणि पुढे 2022-23 मध्ये अंदाजे 11.28 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. नीती आयोगाच्या राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांकानुसार, महाराष्ट्रातील बहुआयामी गरिबीचे प्रमाण 2019-21 या कालावधीत 5.48 टक्के नोंदविण्यात आले असून, हे राष्ट्रीय सरासरी 11.28 टक्क्यांपेक्षा कमी आहे. यावरून राज्याने आरोग्य, शिक्षण आणि जीवनमान या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती साधल्याचे दिसून येते. तथापि, गरिबी कमी होणे आणि विषमता कमी होणे या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. घरगुती उपभोग खर्चातील विषमता काही प्रमाणात घटली असली तरी उत्पन्न, संपत्ती, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि प्रादेशिक संधींच्या वितरणात असमानता कायम आहे. सर्वसमावेशक विकासासाठी रोजगारनिर्मिती, गुणवत्तापूर्ण सार्वजनिक सेवा, सामाजिक संरक्षण, महिला सक्षमीकरण, कृषी व ग्रामीण विकास, कौशल्यविकास आणि प्रादेशिक संतुलन यांना धोरणात्मक प्राधान्य देणे आवश्यक आहे. या लेखाचा उद्देश भारतातील गरिबी व विषमतेच्या स्वरूपाचा अभ्यास करून सर्वसमावेशक विकासासाठी आवश्यक धोरणात्मक उपाय सुचविणे हा आहे.
Keywords
How to Cite This Article
Rights
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE