editor@bjddjournal.org +91 8600071634, +91 98903 82132
Open-Access, Transparent Peer-Reviewed, Refereed

BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE

ISSN: 3139-1486 (Online) | ISSN: 3139-9819 (Print) Impact Factor : 6.21 ESTD Year : 2025
Bi-monthly Multilingual Academic Research Multidisciplinary

*** Important Announcement: Call for Papers! Submissions are now open for the upcoming issue. Please visit the "Submit Paper" section to learn more. ***
← Back to Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development"

माविम अंतर्गत स्वयंसहाय्यता गट चळवळ महिला सक्षमीकरणाचा शाश्वत आधारस्तंभ एक अभ्यास

India

Abstract

प्रस्तुत शोधनिबंध महाराष्ट्र महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM) च्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या आर्थिक स्थैर्य आणि स्वयं-टिकाऊपणा याचे सर्वांगीण परिमाणात्मक व गुणात्मक मूल्यमापन करतो. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील ८० माविम-संलग्न शांग/बचत गटांची 'उद्देशपूर्ण नमुना निवड' (Purposive Sampling) पद्धतीने निवड करून हा वर्णनात्मक आणि तुलनात्मक-अनुभवजन्य अभ्यास पार पाडण्यात आला. संख्यात्मक प्राथमिक माहिती संकलनासाठी संरचित प्रश्नावली, तर सखोल गुणात्मक माहितीसाठी प्रत्यक्ष मुलाखतींचा अवलंब करण्यात आला. गोळा केलेल्या तथ्यांचे विश्लेषण स्वतंत्र नमुना t-चाचणी (Independent Samples t-test) आणि पियर्सन सहसंबंध विश्लेषणाच्या (Pearson Correlation Analysis) आधारे करण्यात आले असून दोन पूर्वघोषित गृहीतकांची सांख्यिकीय तपासणी करण्यात आली आहे. विश्लेषणातून असे स्पष्ट झाले आहे की, अभ्यासातील गटांचा सरासरी कर्ज परतफेड दर ८९% इतका चांगला असला, तरी बाह्य शासकीय किंवा संस्थात्मक अनुदानाशिवाय केवळ ३५% गटच सलग तीन वर्षांपासून पूर्णतः स्वयं-टिकाऊ बनू शकले आहेत. संस्थात्मक बँकांशी नियमित व मजबूत जोडणी (Bank Linkage) असणाऱ्या गटांमध्ये उच्च वित्तीय शिस्त, लक्षणीय कर्ज परतफेड दर (९६.५%), नगण्य अनुत्पादक मालमत्ता (NPA १.८%, p < 0.05) आणि दुप्पट फिरते भांडवल दिसून आले. याव्यतिरिक्त, माविमकडून दिल्या जाणाऱ्या प्रगत व्यवसाय व्यवस्थापन (Business Management) आणि बाजारपेठ जोडणी (Market Linkage) प्रशिक्षणाचा गटांच्या स्वयं-टिकाऊपणा निर्देशांकावर अतिशय मजबूत व सकारात्मक प्रभाव (r = 0.75, p < 0.01) असल्याचे सिद्ध झाले. या ठोस निष्कर्षांच्या प्रकाशात, माविमने पारंपारिक प्रशिक्षणाचे आधुनिकीकरण करून डिजिटल हिशोब नोंदी, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर बंधनकारक करणे, जिल्हा स्तरावर स्वतंत्र 'बाजारपेठ लिंकेज युनिट' (Market Linkage Unit - MLU) उभारणे, प्रशासकीय खर्च ४% च्या आत मर्यादित ठेवणे आणि सातत्यपूर्ण महिला नेतृत्व संवर्धन करणे याविषयीच्या धोरणात्मक उपाययोजना व शिफारशी या शोधनिबंधात विस्तृतपणे मांडण्यात आल्या आहेत.

Keywords

माविम (MAVIM)आर्थिक स्थैर्यस्वयं-टिकाऊपणाबँक लिंकेजमायक्रोफायनान्सबाजारपेठ जोडणी.

How to Cite This Article

सौ. योगिता वसंतराव जिरापुरे. (2026). माविम अंतर्गत स्वयंसहाय्यता गट चळवळ महिला सक्षमीकरणाचा शाश्वत आधारस्तंभ एक अभ्यास. Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development".

Rights

Copyright
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE