विदर्भातील गोंड समाजातील आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण
India
Abstract
विदर्भ हा भौगोलिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्टया महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचा प्रदेश आहे. या प्रदेशाला समृद्ध जंगले आणि खनिज संपत्तीचे वरदान लागले आहे. याच विदर्भांच्या जंगलामध्ये आणि डोंगराळ भागात शतकानुशतके वास्त़व करणारा गोंड समाज हा येथील प्रमुख आदिवासी समुदाय आहे. गोंड समाजाला एक गौरवशाली ऐतिहासिक वारसा लाभला असून, एकेकाळी विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या भागावार गोंड राजांचे वैभवशाली राज्य़ होते. मात्र, काळाच्या ओघात आणि बदलत्या आर्थिक सामाजिक प्रवाहात आज या समाजाची आर्थिक स्थिती अत्यंत आव्हानात्म़क बनली आहे. एकेकाळी जंगलाचे राजे असलेल्या या समाजाची आर्थिक अर्थव्यवस्था पूर्णपणे जल, जंगल आणि जमिनीवर आधारित होती. परंतू आधूनिक काळात झालेले वन कायदे, औद्योगिकीकरण आणि सातत्याने होणारे विस्थापन यामुळे त्यांच्या पारंपारिक उपजिवीकेच्या साधनावर गदा आली आहे. आज विदर्भातील विशेषता: गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यामधील गोंड बांधव प्रामुख्याने शेती आणि शेतमजुरीवर अवलंबून आहेत. 1947 पूर्वी (स्वातंत्र्य़पूर्व काळात) विदर्भातील गोंड समाजाची आर्थिक परिस्थिती ही प्रामुख्याने जल, जंगल आणि जमिनीतील आधारित स्वावलंबी व्यवस्थेकडून ब्रिटिश राजवटीत झालेल्या तीव्र शोषणाकडे आणि दारिद्रयाकडे झुकणारी होती. 1947 नंतर विदर्भातील गोंड समाजाची आर्थिक परिस्थिती प्रामुख्याने परंपरागत वन-आधारित उपजिविकेपासुन आधुनिक बाजारपेठ, सरकारी योजना आणि संविधानात्म़क आरक्षणाच्या प्रभावामुळे मोठ्या स्थित्यंतरातून गेली आहे. स्वातंत्र्योत्त़र काळात 1947 नंतर जमिनीचे हक्क़ हिरावले जाणे, जंगल कायद्यामधील कडक निर्बंध आणि औद्योगिकीकरण यामुळे या समाजाला तीव्र आर्थिक आव्हानाचा सामना करावा लागला, गोंड समाजाची आर्थिक रचना समजून घेतांना 1947 हे महत्वाचे विभाजन बिंदू ठरते.
How to Cite This Article
Rights
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE