तृतीयपंथीयांच्या जन्मामागील जैविक व सामाजिक कारणांचा अभ्यास
India
Abstract
मानवाला जन्म घेण्याचे स्वातंत्र नाही, तसे असते तर तृतीयपंथी समाज उदयास आलेला नसता. निसर्गाने जन्मतः स्त्रि व पुरूष या दोघांना सामाजिक मान्यता दिलेली आहे. परंतू तृतीयपंथी यांची ओळख उपेक्षित घटकामध्येच केली जाते. एखादया कुटूंबात तृतीयपंथी बाळ जन्माला जर आलेच तर ती सत्यता समाजाला सांगण्याची हिंम्मत त्या कुटूंबाला येईल काय? त्याच कुटूंबात व समाजात त्याला दुय्यम स्थान, हिन वागणूक का दिली जाते. गुणसुत्रातील जनुकांच्या बदलामुळे जनन प्रक्रियामध्ये जे बदल होतात व त्यामुळे तृतीयपंथी बाळ जन्माला येतात. Biological Sex, Gender Identity आणि Sexual Orientation म्हणजे जन्माच्या वेळी जे काही जन्मलेल्या मुलांचे जनांग असतात त्यावरून तो मुलगा आहे की मुलगी ठरविली जाते. Biological Sex म्हणजे बाहय जनांगावरून ठरविण्यात आलेले व्यक्तीचे लिंग. यामध्ये ढोबळ मानाने तिन प्रकार पडतात स्त्रि, पुरूष आणि इंटरसेक्स. इटरसेक्स म्हणजे बाळाचे बाहय सेक्स ऑर्गन्सहून स्पष्ट होत नसतात की तो स्त्रि आहे की पूरूष. इंटरसेक्स ही एक मेडीकल शारिरीक ऑबनॉर्मलिटी असते. ज्यात बाळाचे सेक्स ऑर्गन्स जन्मतः मुलांचे आहेत की मुलींचे आहेत ते स्पष्ट ओळखायला येत नसतात. त्याची एक तर वाढ पुर्ण झालेली नसते. मुलांच्या किंवा मुलींच्या ‘‘क्लिटोरिस” नावाचा अवयव जास्तीचा वाढलेला असतो, आणि बाकीच्या अवयवांची वाढ अपूर्ण असते त्यामुळे तृतीयपंथी बाळ जन्माला येवू शकते ही शक्यता नाकारता येत नाही. (धुमाळ, 2023) 2021 सालातील IPSOS हया संशोधन संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात 3% समलैंगिक, 9% उभयलैंगिक BISEXUAL] 1.6% पारलिंगी TRANSGENDER, अर्थात एक हजारात एक ते सहा, 1% PANSEXUAL] 2% लैंगिक भावना नसलेले ASEXUAL व 69% विरूध्द लिंगाबद्दल आकर्षण असणारे सामान्य लोक आहेत. काही लोकांना आपण नक्की कुठल्या प्रकारात आहोत हे कळलेले नाही किंवा ते उत्तर देऊ इच्छित नाहीत. (कुलकर्णी, 2023)
Keywords
How to Cite This Article
Rights
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE