महात्मा गांधी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था : ग्रामस्वराज्य, स्वावलंबन आणि विकेंद्रीकरणाचा ऐतिहासिक दृष्टिकोन
India
Abstract
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महात्मा गांधींचे योगदान केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरते मर्यादित नव्हते. राजकीय स्वराज्याबरोबरच आर्थिक स्वावलंबन, सामाजिक समता आणि ग्रामीण पुनर्रचना यांना त्यांनी विशेष महत्त्व दिले. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारताची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर ग्रामीण आणि कृषीप्रधान होती. ब्रिटिश वसाहतवादी आर्थिक धोरणांमुळे पारंपरिक ग्रामीण उद्योग, हस्तव्यवसाय आणि कारागीर वर्गावर प्रतिकूल परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर गांधींनी भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पुनर्रचनेसाठी खादी, ग्रामोद्योग, स्वदेशी, श्रमप्रतिष्ठा, विकेंद्रीकरण, ग्रामस्वराज्य आणि आर्थिक समता या संकल्पना पुढे आणल्या. महात्मा गांधींच्या आर्थिक विचारांचा केंद्रबिंदू अमर्याद उत्पादन किंवा नफा नसून मानवी गरजा, रोजगार, स्वावलंबन आणि सामाजिक न्याय हा होता. त्यांच्या मते गाव हे भारतीय अर्थव्यवस्थेचे मूलभूत केंद्र असावे. शेतीबरोबरच खादी, तेलघाणी, हाताने धान्य दळणे-कांडणे, मधमाशीपालन, साबणनिर्मिती, कातडी प्रक्रिया, कागदनिर्मिती इत्यादी ग्रामोद्योगांना चालना दिल्यास ग्रामीण जनतेला पूरक रोजगार मिळू शकतो. गांधींच्या Constructive Programme मध्ये खादी, इतर ग्रामोद्योग, शेतकरी, मजूर, ग्रामस्वच्छता आणि आर्थिक समता यांचा समावेश होता. या लेखात गांधींच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेचा ऐतिहासिक संदर्भ, ग्रामस्वराज्याची कल्पना, खादी व ग्रामोद्योगांचे आर्थिक महत्त्व, शेती आणि ग्रामीण रोजगार, विकेंद्रीकरण, श्रमप्रतिष्ठा आणि आधुनिक काळातील त्यांची उपयुक्तता यांचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे.
Keywords
How to Cite This Article
Rights
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE