महिला सक्षमीकरण आणि भारताचे आर्थिक स्थित्यंतर: एक दृष्टिक्षेप
India
Abstract
देशविकासामध्ये महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिलेले आहे. मानवी जीवनाच्या प्रत्येक कालखंडामध्ये महिलांनी घर-कुटुंब, समाज आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण सहयोग दिलेला आहे. महिलांचे हे अतुलनीय कर्तृत्व लक्षात घेता त्यांच्या सन्मानार्थ ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’1 अशी उदात्त भूमिका भारतीय संस्कृतीने स्वीकारली असल्याचे दिसून येते. भारतीय समाजव्यवस्थेमधील महिलांचे स्थान अभ्यासताना प्रकर्षाने लक्षात येते की, भारतीय समाजव्यवस्थेमध्ये अपवादात्मक कालखंड वगळता महिला नेहमी सन्मानाकरिता पात्र राहिलेल्या आहेत. त्यामागे त्यांचा त्याग, पराक्रम आणि सामाजिक योगदान कारणीभूत होते. तथापि मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक सामाजिक स्थित्यंतरे घडून आली. त्यामुळे घर-कुटुंब, समाज आणि राष्ट्रउभारणीमध्ये योगदान देणारी स्त्री पुरुषांच्या तुलनेत दुय्यम ठरविण्यात आली. अनेक प्रकारच्या मर्यादांमध्ये तिचे जीवन सीमित करण्यात आले. तसेच अनेक बंधने तिच्यावर लादण्यात आलीत. त्यामुळे ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’2 अशी उदात्त भूमिका स्वीकारणाऱ्या भारतीय समाजामध्ये महिलांबाबत “ढोल गँवार शूद्र पशु नारी। ये सब ताडन के अधिकारी।।”3 याप्रकारचे मत नोंदविण्यात आल्याचे देखील दिसून येते. तात्पर्य असे की, भारतीय समाजव्यवस्था ज्या अनेक कालखंडांमधून मार्गक्रमण करीत गेली त्या सर्व कालखंडामध्ये घर-कुटुंब, समाज आणि राष्ट्रउभारणीमध्ये महिलांचे योगदान अतुलनीय राहिलेले आहे. महिला या जीवनाच्या बरोबरीच्या भागीदार आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचा अधिकार आणि त्यानुसार प्राप्त होणारा सन्मान देणे हे सामाजिक, राष्ट्रीय आणि नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये महिला विकासाकरिता विशेष प्रयत्न करण्यात आले. याचा सकारात्मक परिणाम म्हणून आज महिला जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेत आहेत. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी महिला घर-कुटुंब, समाज आणि राष्ट्राला पुढे नेण्यामध्ये विकसित करण्यामध्ये योगदान देऊ शकतात, हे आपल्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध केलेले आहे. त्यामुळे ‘विकसित भारत - 2047 च्या स्वप्नपूर्तीमध्ये महिलांचे योगदान अतुलनीय राहणार असल्याचे मान्य करावे लागते. महत्त्वाचे म्हणजे आज भारतीय अर्थव्यवस्थेला कजी उर्जितावस्था प्राप्त झालेली आहे. त्यामागे महिला सक्षमीकरण धोरण प्रामुख्याने कारणीभूत आहे. ‘महिला सक्षमीकरण आणि भारताचे आर्थिक स्थित्यंतर’ या परस्परपूरक बाबी आहेत, त्यामुळे महिला सक्षमीकरण ज्या गतीने होत राहील त्याच वेगाने देशाचा आर्थिक विकास होणार आहे.
Keywords
How to Cite This Article
Rights
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE