editor@bjddjournal.org +91 8600071634, +91 98903 82132
Open-Access, Transparent Peer-Reviewed, Refereed

BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE

ISSN: 3139-1486 (Online) | ISSN: 3139-9819 (Print) Impact Factor : 6.21 ESTD Year : 2025
Bi-monthly Multilingual Academic Research Multidisciplinary

*** Important Announcement: Call for Papers! Submissions are now open for the upcoming issue. Please visit the "Submit Paper" section to learn more. ***
← Back to Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development"

भारताच्या आर्थिक विकासावर डिजिटलाझेशनचा प्रभाव

India

Abstract

सध्याचे युग हे डिजिटलायझेशनचे युग आहे. गेल्या काही वर्षात भारताचे डिजिटल परिवर्तन उल्लेखनिय ठरले आहे. ज्यामध्ये स्मार्टफोन, इंटरनेट, कनेक्टिव्हिटी आणि बँकिंग तंत्रज्ञानाचा जलद वापर डिजिटल अर्थव्यवस्थेत वेगाने वाढ करण्यात यशस्वी ठरला आहे. डिजिटलायझेशनमुळे अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये आर्थिक विकासाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. वेगवान डिजिटलायझेशनचा देशाच्या आर्थिक विकासावर लक्षणीय परिणाम झाला आहे. डिजिटलायझेशनचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला मुख्य मार्ग म्हणजे ई-कॉमर्स. ई-कॉमर्सने भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकला आहे. भारतातील ई-कॉमर्सच्या वाढीमुळे व्यवसायासाठी ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी आणि ग्राहकांसाठी उत्पादने आणि सेवा सुलभ करण्यासाठी नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. भारत सरकार देखील सक्रियपणे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देत आहे. या सोबतच आर्थिक क्षेत्रांनाही मोठी चालना मिळाली आहे. भारत जसजसा डिजिटल परिवर्तनाच्या मार्गावर पुढे जात आहे तसतसे आर्थिक क्षेत्रात आणखी वाढ आणि विकासाच्या शक्यता वाढत आहेत. भारत डिजिटल दशकात वावरत आहे. भारताच्या GDP मध्ये डिजिटल अर्थव्यवस्था 2026 पर्यंत 20% ने वाढण्याचा अंदाज आहे. आणि भारताची डिजिटल अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 6 पटीने वाढवून 01 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. भारताची इंटरनेट अर्थव्यवस्था चालू दशकाच्या अखेरीस तिच्या GDP च्या 12-13 टक्के वाढेल. भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट घेऊन पुढे जात आहे. जे डिजिटल अर्थव्यवस्थेला बळकट करूनच साध्य केले जाऊ शकते. डिजिटलायझेशनमुळे आर्थिक विकासाला वेग आला आहे, परंतु आजही अनेक ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यामूळे तेथील रहिवासी तांत्रिक माध्यमांचा वापर करू शकत नाहीत. तांत्रिक माध्यमांच्या वापरात फसवणूक आणि बनावटगिरीमूळे अनेक लोक डिजिटल तंत्रज्ञावर विश्वास ठेवण्यास सक्षम नाहीत. भारताच्या आर्थिक विकासावर डिजिटलायझेशनचा परिणाम सकारात्मक झाला आहे. तरीही देशातील सर्व नागरिकांना डिजिटल तंत्रज्ञानाची जाणीव करुन देण्याची गरज आहे. जेणेकरून करून प्रत्येक व्यक्तीला डिजिटलायझेशनचा लाभ होता येईल.

How to Cite This Article

प्रा. डॉ. परमेश्वर लिंबाजी लोडे. (2026). भारताच्या आर्थिक विकासावर डिजिटलाझेशनचा प्रभाव. Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development".

Rights

Copyright
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE