editor@bjddjournal.org +91 8600071634, +91 98903 82132
Open-Access, Transparent Peer-Reviewed, Refereed

BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE

ISSN: 3139-1486 (Online) | ISSN: 3139-9819 (Print) Impact Factor : 6.21 ESTD Year : 2025
Bi-monthly Multilingual Academic Research Multidisciplinary

*** Important Announcement: Call for Papers! Submissions are now open for the upcoming issue. Please visit the "Submit Paper" section to learn more. ***
← Back to Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development"

पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास

India

Abstract

कोणतीही चळवळ अयशस्वी होण्यामागची कारणे ही त्या चळवळीच्या मूळ उद्देशाबाबत जनमानसात नसलेली ‘जागृती’ तसेच अर्धवट ज्ञान यात असतात. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास ही एक चळवळ आहे आणि पर्यावरण शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीत पर्यावरण रक्षणाला खुप महत्त्व दिले गेले आहे. भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे व निसर्गाशी जीवन निगडीत असल्यामुळे तसेच देशाची कृषी व ऋषी परंपरा असल्यामुळे नैसर्गिक परिस्थितीला धोका पोहचणार नाही याची काळजी भारत वासियांनी घेतलेली आहे. परंतु भारतात पर्यावरणाचा ऱ्हास: एक संकट, पर्यावरण व आरोग्य विषयक समस्या, पर्यावरण संरक्षण काळाची गरज, पर्यावरण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे, पर्यावरण संरक्षण व संवर्धन कायदे यांची पाहिजे तशी अंमलबजावणी होत नाही. प्राचीन भारतात भारतीय ऋषी मुनी पृथ्वी व नैसर्गिक वातावरणाला खुप महत्त्व देत असत. ते निसर्गाशी तल्लीन व लीन होत असत. आदरयुक्त भावनेने कल्याणाचा विचार मांडत असत. परंतु मानवाच्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणातील विविध घटकांवर परिणाम होवून पर्यावरणातील विविध नैसर्गिक संसाधने तसेच विविध प्रजातीच्या अस्तित्वावर व उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मानवी हस्तक्षेप याच प्रमाणात पुढे ही चालू राहिला तर भविष्यातील मानवी पिढयांना जगण्यासाठीही कडवा संघर्ष करावा लागेल. ही परिस्थिती उदभवू नये म्हणून वेळीच जागरुक होण्याची व इतरांना पर्यावरण संरक्षणाप्रती जागृत करण्याची आज नितांत गरज आहे.

How to Cite This Article

डॉ. खोकले दत्ता किशनराव. (2026). पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास. Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development".

Rights

Copyright
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE