ग्रामीण महिलांच्या उच्च शिक्षणातील गरिबी सामाजिक विषमता आणि समावेशक विकास: एक समाजशास्त्रीय अध्ययन
वर्षा किसनराव चव्हाण · India
Abstract
भारतीय समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये शिक्षणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. विशेषतः महिलांचे उच्च शिक्षण हे त्यांच्या वैयक्तिक विकासाबरोबरच कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण साधन आहे. ग्रामीण भागातील महिलांना उच्च शिक्षण घेताना गरिबी,आर्थिक अडचणी, सामाजिक विषमता, कुटुंबीयांच्या जबाबदाऱ्या,सुरक्षिततेची समस्या, प्रवासाच्या अडचणी, डिजिटल साधनांचा अभाव आणि शैक्षणिक सुविधांची मर्यादित उपलब्धता अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे उच्च शिक्षणातील संधी सर्व महिलांना समान प्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यामुळे महिला उच्च शिक्षण घेण्यासाठी असमर्थ ठरतात. गरीब आहे केवळ उत्पन्नाची कमतरता नसून शिक्षण, आरोग्य, रोजगार, सामाजिक सहभाग आणि निर्णय क्षमता यांसारख्या अनेक संधींवरील मर्यादा निर्माण करणारी सामाजिक परिस्थिती आहे. ग्रामीण महिलांच्या उच्च शिक्षणातील विषमता कमी करण्यासाठी आर्थिक मदत, शिष्यवृत्ती, सुरक्षित वाहतूक, वसतिगृह सुविधा, डिजिटल शिक्षण, कौशल्य विकास आणि कुटुंबीयांची सकारात्मक भूमिका आवश्यक आहे. समावेशक विकासाच्या दृष्टीने महिलांना गुणवत्ता पूर्ण उच्च शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
Keywords
How to Cite This Article
Rights
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE