editor@bjddjournal.org +91 8600071634, +91 98903 82132
Open-Access, Transparent Peer-Reviewed, Refereed

BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE

ISSN: 3139-1486 (Online) | ISSN: 3139-9819 (Print) Impact Factor : 6.21 ESTD Year : 2025
Bi-monthly Multilingual Academic Research Multidisciplinary

*** Important Announcement: Call for Papers! Submissions are now open for the upcoming issue. Please visit the "Submit Paper" section to learn more. ***
← Back to Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development"

विकसित भारत @ 2047 : बदलते भू-राजकारण, सामरिक स्वायत्तता आणि भारताची उदयोन्मुख जागतिक भूमिका

India

Abstract

भारताने स्वातंत्र्याच्या अमृतकाळातून पुढे जात 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे ध्येय निश्चित केले आहे. ‘विकसित भारत @ 2047’ ही संकल्पना केवळ आर्थिक विकास किंवा सकल देशांतर्गत उत्पादन वाढीपुरती मर्यादित नसून आर्थिक स्पर्धात्मकता, सामाजिक समावेशन, तंत्रज्ञान, शाश्वत विकास, राष्ट्रीय सुरक्षा, सुशासन आणि जागतिक पातळीवरील प्रभावी भूमिका या सर्व घटकांचा समन्वय करणारी व्यापक संकल्पना आहे. नीती आयोगाच्या विविध दस्तऐवजांमध्येही विकसित भारताच्या संकल्पनेत आर्थिक प्रगतीसोबत राष्ट्रीय सुरक्षा, जागतिक भागीदारी, धोरणात्मक प्रभाव आणि सुशासनाला महत्त्व देण्यात आले आहे. दरम्यान, एकविसाव्या शतकातील जागतिक राजकारणामध्ये मोठे परिवर्तन होत आहे. अमेरिका-चीन स्पर्धा, रशिया-युक्रेन संघर्ष, इंडो-पॅसिफिक प्रदेशातील वाढते सामरिक महत्त्व, पुरवठा साखळीतील अस्थिरता, ऊर्जा व अन्नसुरक्षेची आव्हाने आणि बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय यामुळे भारतासमोर नवीन संधी तसेच आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत भारताने कोणत्याही एका शक्तिकेंद्राशी पूर्णपणे बांधील न राहता आपल्या राष्ट्रीय हितानुसार विविध देशांशी सहकार्य करण्याची सामरिक स्वायत्तता स्वीकारली आहे. सदर संशोधन लेखात विकसित भारत @ 2047 या संकल्पनेचा बदलत्या भू-राजकीय परिस्थितीच्या संदर्भात अभ्यास करण्यात आला आहे. भारताची सामरिक स्वायत्तता, ग्लोबल साऊथमध्ये भारताची भूमिका, बहुपक्षीय संस्थांमधील सहभाग आणि 2047 पर्यंत भारतासमोरील संधी व आव्हाने यांचे चिकित्सक विश्लेषण करण्यात आले आहे.

How to Cite This Article

श्री. बबलू सुरेश मासोदकर. (2026). विकसित भारत @ 2047 : बदलते भू-राजकारण, सामरिक स्वायत्तता आणि भारताची उदयोन्मुख जागतिक भूमिका. Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development".

Rights

Copyright
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE