कृषी क्षेत्रातील पीक विविधीकरण आणि शाश्वत विकास : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनाचा अमरावती जिल्ह्यातील अभ्यास
India
Abstract
भारतीय कृषी क्षेत्रासमोर पाण्याची मर्यादित उपलब्धता, पर्जन्यमानातील अनिश्चितता, बदलते हवामान आणि पारंपरिक सिंचन पद्धतींमधील मर्यादा ही महत्त्वाची आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनाला कृषी क्षेत्रातील जलव्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण साधन मानले जाते. सूक्ष्म सिंचनामुळे उपलब्ध पाण्याचा नियंत्रित वापर करण्याबरोबरच शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे व नगदी पिकांकडे वळण्यास संधी निर्माण होऊ शकते. प्रस्तुत संशोधनाचा मुख्य उद्देश सूक्ष्म सिंचनामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विविधीकरणामध्ये झालेल्या बदलाचा अभ्यास करणे हा आहे. संशोधनासाठी 7 तालुक्यांमधील 28 गावांतील 560 सूक्ष्म सिंचन लाभार्थी शेतकऱ्यांची प्राथमिक माहिती प्रश्नावलीच्या माध्यमातून संकलित करण्यात आली आहे. अभ्यासासाठी वर्णनात्मक व विश्लेषणात्मक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. 560 उत्तरदात्यांपैकी 539 शेतकऱ्यांनी (96.25%) सूक्ष्म सिंचनामुळे भाजीपाला, फळे व नगदी पिकांच्या लागवडीत बदल झाल्याचे सांगितले, तर 21 शेतकऱ्यांनी (3.75%) काही प्रमाणात बदल झाल्याचे नमूद केले. कोणत्याही उत्तरदात्याने बदल झाला नसल्याचे सांगितले नाही.
Keywords
How to Cite This Article
Rights
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE