महाराष्ट्राच्या विकासात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे योगदान
India
Abstract
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागातील रोजगार, उपजीविकेची सुरक्षितता आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राबविण्यात येणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम, 2005 यांचा कायदेशीर आधार असून, ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्यांनी अकुशल शारीरिक कामाची मागणी केल्यास प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 100 दिवस रोजगाराची हमी देणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रासारख्या कृषिप्रधान राज्यात रोजगारनिर्मिती, जलसंधारण, मृदसंधारण, ग्रामीण रस्ते, शेतीपूरक मालमत्ता निर्मिती आणि सामाजिक समावेशन या क्षेत्रांमध्ये या योजनेला विशेष महत्त्व आहे. या संशोधन लेखात महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासातील रोजगार हमी योजनेचे आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय योगदान स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच योजनेच्या अंमलबजावणीतील मर्यादा, रोजगाराची उपलब्धता, वेतन देयकांतील विलंब, कामांची गुणवत्ता आणि पारदर्शकता या बाबींचाही विचार केला आहे. उपलब्ध शासकीय आकडेवारीच्या आधारे योजनेच्या परिणामांचा आढावा घेऊन अधिक परिणामकारक अंमलबजावणीसाठी उपाय सुचविण्यात आले आहेत.
How to Cite This Article
Rights
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE