editor@bjddjournal.org +91 8600071634, +91 98903 82132
Open-Access, Transparent Peer-Reviewed, Refereed

BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE

ISSN: 3139-1486 (Online) | ISSN: 3139-9819 (Print) Impact Factor : 6.21 ESTD Year : 2025
Bi-monthly Multilingual Academic Research Multidisciplinary

*** Important Announcement: Call for Papers! Submissions are now open for the upcoming issue. Please visit the "Submit Paper" section to learn more. ***
← Back to Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development"

मराठवाड्यातील कृषी तंत्रज्ञान स्वीकारात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची भूमिका

India

Abstract

मराठवाडा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा कृषिप्रधान प्रदेश आहे. या प्रदेशातील अनेक शेतकरी पावसावर अवलंबून शेती करतात. पावसातील अनियमितता, पाण्याची कमतरता, वाढता उत्पादन खर्च, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, बाजारभावातील चढ-उतार आणि शेतीमालाच्या विक्रीतील अडचणी यांमुळे शेतीसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या परिस्थितीत कृषी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे महत्त्वाचे ठरते. सुधारित बियाणे, आधुनिक लागवड पद्धती, माती व पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण, कृषी यांत्रिकीकरण आणि हवामानानुसार पीक नियोजन यांमुळे शेतीची उत्पादकता आणि आर्थिक व्यवहार्यता सुधारण्यास मदत होऊ शकते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी हे मराठवाड्यातील कृषी संशोधन, शिक्षण आणि विस्तार शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. विद्यापीठाने या प्रदेशातील हवामान, जमीन, पाण्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विविध पिकांचे सुधारित वाण आणि शेतीविषयक तंत्रज्ञान विकसित केले आहे. कृषी विज्ञान केंद्रे, शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, कृषी मेळावे, कृषीविषयक प्रकाशने आणि शेतकऱ्यांना दिले जाणारे तांत्रिक मार्गदर्शन यांच्या माध्यमातून हे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाते. या संशोधन लेखाचा मुख्य उद्देश मराठवाड्यातील कृषी तंत्रज्ञान स्वीकारात विद्यापीठाची भूमिका समजून घेणे हा आहे. या अभ्यासासाठी विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ, वार्षिक अहवाल, शेतीभाती अंक, कृषी दैनंदिनी २०२५ आणि कृषी विज्ञान केंद्रांशी संबंधित उपलब्ध माहितीचा उपयोग केला आहे. अभ्यासाचे स्वरूप वर्णनात्मक व विश्लेषणात्मक असून त्यासाठी दुय्यम माहितीचा वापर केला आहे. विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर वाढवणे आणि शेती अधिक उत्पादक व शाश्वत बनवणे यासाठी विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट होते.

Keywords

कृषी तंत्रज्ञानमराठवाडावसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठकृषी विज्ञान केंद्रशाश्वत शेती. शेतकरी.

How to Cite This Article

ज्ञानेश्वर उद्धवराव आवचार. (2026). मराठवाड्यातील कृषी तंत्रज्ञान स्वीकारात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची भूमिका. Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development".

Rights

Copyright
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE