editor@bjddjournal.org +91 8600071634, +91 98903 82132
Open-Access, Transparent Peer-Reviewed, Refereed

BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE

ISSN: 3139-1486 (Online) | ISSN: 3139-9819 (Print) Impact Factor : 6.21 ESTD Year : 2025
Bi-monthly Multilingual Academic Research Multidisciplinary

*** Important Announcement: Call for Papers! Submissions are now open for the upcoming issue. Please visit the "Submit Paper" section to learn more. ***
← Back to Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development"

गरीबी, असमानता आणि समावेशक विकास

India

Abstract

दारिद्र्य, आर्थिक सामाजिक असमानता आणि समावेशक विकास हे आधुनिक विकास अर्थशास्त्रातील परस्परांशी निगडीत असे महत्वाचे घटक आहे. आर्थिक वाढीचा दर वाढला म्हणजे समाजातील सर्व घटकांच्या जीवनमानात समान प्रमाणात सुधारणा होतेच असे नाही. उत्पन्न, संपत्ती, शिक्षण, आरोग्य, रोजगार, तंत्रज्ञान, मूलभूत सुविधा आणि सामाजिक संधी यांच्या वितरणामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्यास आर्थिक वाढीचे फायदे समाजातील काही घटकांपुरते मर्यादित राहू शकतात. म्हणून विकसाचा विचार नुसते राष्ट्रीय उत्पन्न अथवा दरडोई उत्पन्नाच्या वाढीपुरता न करता त्याच्या वितरणात्मक आणि मानवी परिणामांच्या संदर्भात करणे आवश्यक आहे. दारिद्र्याचे स्वरूपदेखील केवळ उत्पन्नाच्या अभावापुरते मर्यादित राहिलेले नाही. शिक्षण, आरोग्य, पोषण, निवास, स्वच्छता, वीज, सुरक्षित पिण्याचे पाणी आणि जीवनमानातील इतर मूलभूत सुविधांचा अभाव यांचा समावेश बहुआयामी दारिद्र्यात होतो. भारतातील राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकानुसार 2015-16 ते 2019-20 या काळात बहुआयामी दारिद्र्याचे प्रमाण 24.85 टक्क्यांवरून 14.96 टक्यापर्यन्त कमी झाले. या काळात सुमारे 13.5 कोटी व्यक्ती बहुआयामी दारिद्र्याचे बाहेर आल्याचे यू एन डी पी व नीती आयोग यांच्या विश्लेषणातून नमूद केले आहे. सदर संशोधनात दारिद्र्य व असमानतेची संकल्पना, प्रकार, परस्पर संबंध, भारतातील स्थिती, बहुआयामी दारिद्र्य, ग्रामीण- शहरी व सामाजिक विषमता, रोजगार व शिक्षणाची भूमिका, सामाजिक संरक्षण व समावेशक विकासाची आवश्यकता यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. समावेशक विकासासाठी उत्पादक, रोजगार निर्मिती, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य सुविधा, सामाजिक सुरक्षा, आर्थिक समवेशन, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, ग्रामीण पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, आणि वंचित समूहांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट होते.

Keywords

बहुआयामी दारिद्र्यसमावेशक विकाससामाजिक सुरक्षाआर्थिक समावेशनमानवी विकासशास्वत विकास.

How to Cite This Article

डॉ. सावन किसन राठोड. (2026). गरीबी, असमानता आणि समावेशक विकास. Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development".

Rights

Copyright
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE