विदर्भातील कृषी संकट : कारणे, परिणाम आणि धोरणात्मक उपाययोजना
India
Abstract
विदर्भ हा भारतातील महाराष्ट्र राज्याचा एक महत्त्वपूर्ण प्रदेश आहे. या प्रदेशात कृषी संकट हे एक मोठे सामाजिक-आर्थिक आव्हान आहे. या प्रदेशाची कृषी अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने मान्सून पावसावर अधिक अवलंबून आहे. एकंदरीत मान्सूनच्या पावसावरील अधीक अवलंबित्व, कापूस आणि सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड/पेरणी, लहान आणि अल्पभूधारक जमीन, वाढता कृषी उत्पादन खर्च, शेतमालाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात होणारे चढउतार आणि विदर्भातील विविध भागांमध्ये असलेली सिंचनाची मर्यादित उपलब्धता ही विदर्भाच्या अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. विदर्भाच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये दर्शविणारे हे घटक, शेतक-यांचा कर्जबाजारीपणा, हवामानातील बदल आणि किफायतशीर बाजारपेठांपर्यंत शेतक-यांना पोहचण्यासाठी करावा लागणारा विविध अडचणीचा सामना, यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आणि ग्रामीण उपजीविकेच्या शाश्वततेवर देखील परिणाम करतात. कृषी संकटाचे परिणाम केवळ शेतीपुरते मर्यादित राहत नाहीत, तर ते ग्रामीण रोजगार, कौटुंबिक उपभोग, शिक्षण, आरोग्य आणि स्थलांतर यांवर सुद्धा प्रभाव टाकतात. हा शोधनिबंध विदर्भातील कृषी संकटाची प्रमुख कारणे आणि परिणाम यांचे परीक्षण करतो आणि शेतकऱ्यांची आर्थिक सुरक्षा सुधारण्याच्या उद्देशाने असलेल्या धोरणात्मक उपायांचे मूल्यांकन करतो. या संशोधन अभ्यासामध्ये सरकारी अहवाल, कृषी आकडेवारी, संशोधन प्रकाशने आणि धोरण दस्तऐवजांमधील दुय्यम आधारसामुग्रीवर आधारित वर्णनात्मक आणि विश्लेषणात्मक दृष्टीकोन मांडला आहे. या संशोधन अभ्यासामध्ये असा युक्तिवाद करण्यात आला आहे की कृषी संकटावर मात करण्यासाठी शाश्वत शेती, सिंचन विकास, परवडणारे संस्थात्मक कर्ज, प्रभावी पीक विमा, कृषी मालाला किफायतशीर भाव/किंमत, बाजार सुधारणा, पीक विविधता आणि अधिक मजबूत ग्रामीण पायाभूत सुविधा यांचा समावेश असलेल्या एकात्मिक धोरणाची गरज आहे.
Keywords
How to Cite This Article
Rights
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE