editor@bjddjournal.org +91 8600071634, +91 98903 82132
Open-Access, Transparent Peer-Reviewed, Refereed

BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE

ISSN: 3139-1486 (Online) | ISSN: 3139-9819 (Print) Impact Factor : 6.21 ESTD Year : 2025
Bi-monthly Multilingual Academic Research Multidisciplinary

*** Important Announcement: Call for Papers! Submissions are now open for the upcoming issue. Please visit the "Submit Paper" section to learn more. ***
← Back to Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development"

भारतातील डिजिटल सेवा आणि आर्थिक वृद्धी: एक विश्लेषणात्मक अभ्यास

India

Abstract

भारतातील डिजिटल सेवा क्षेत्र हे आर्थिक वृद्धी, रोजगार निर्मिती, नवोपक्रम/नवनिर्मिती आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता यामध्ये एक महत्त्वपूर्ण योगदान देणारे क्षेत्र म्हणून उदयास आले आहे. माहिती तंत्रज्ञान (IT), आयटी-सक्षम सेवा (ITES), डिजिटल पेमेंट, ई-कॉमर्स, क्लाउड कंप्युटिंग आणि ऑनलाइन व्यावसायिक सेवांच्या विस्तारामुळे व्यवसाय चालवण्याच्या आणि ग्राहक सेवा मिळवण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. डिजिटलीकरणामुळे उत्पादक, ग्राहक, वित्तीय संस्था आणि सरकारी संस्था यांच्यातील संपर्कदेखील सुधारला आहे. हा संशोधन अभ्यास भारतातील डिजिटल सेवा आणि आर्थिक वृद्धी यांच्यातील संबंध अभ्यासतो, ज्यामध्ये आर्थिक उत्पादन, रोजगार, निर्यात आणि वित्तीय समावेशन यांमध्ये या क्षेत्राच्या योगदानावर विशेष भर देण्यात आला आहे. हा संशोधन अभ्यास संबंधित संशोधन लेख, पुस्तके, सरकारी अहवाल, भारतीय रिझर्व्ह बँकेची प्रकाशने आणि वेबसाईट्स यांवरुन प्राप्त केलेल्या दुय्यम आधारसामुग्रीवर आधारित आहे. डिजिटल सेवांच्या विस्ताराशी संबंधित विविध संधी आणि आव्हानांचे परीक्षण करण्यासाठी या संशोधन अभ्यासामध्ये वर्णनात्मक आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन अवलंबला आहे. या अभ्यासातून असे निदर्शनास येते की, डिजिटल सेवांमुळे उत्पादकतेमध्ये वाढ होऊ शकते, भारतातील सेवांची निर्यात मजबूत होऊ शकते, उद्योजकतेला प्रोत्साहन प्राप्त होऊ शकते आणि एकंदरित सर्वसमावेशक विकासाला पाठिंबा देऊ शकते. असे असताना देखील अजूनही डिजिटल दरी, सायबरसुरक्षेचे धोके, कौशल्यातील तफावत आणि रोजगाराशी संबंधित अनिश्चितता ही महत्त्वपूर्ण आव्हाने अजूनही कायम आहेत. या संशोधन अभ्यासाअंती असा निष्कर्ष निदर्शनास येतो की, भारतातील शाश्वत आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासामध्ये डिजिटल सेवांचे योगदान सुनिश्चित करण्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, नवोन्मेष आणि सायबरसुरक्षा यामध्ये सातत्यपूर्ण गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

Keywords

डिजिटल सेवाआर्थिक वृद्धीडिजिटल अर्थव्यवस्थामाहिती तंत्रज्ञानरोजगारवित्तीय समावेशन.

How to Cite This Article

डॉ. प्रतिक्षा नारायण टिकार. (2026). भारतातील डिजिटल सेवा आणि आर्थिक वृद्धी: एक विश्लेषणात्मक अभ्यास. Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development".

Rights

Copyright
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE