editor@bjddjournal.org +91 8600071634, +91 98903 82132
Open-Access, Transparent Peer-Reviewed, Refereed

BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE

ISSN: 3139-1486 (Online) | ISSN: 3139-9819 (Print) Impact Factor : 6.21 ESTD Year : 2025
Bi-monthly Multilingual Academic Research Multidisciplinary

*** Important Announcement: Call for Papers! Submissions are now open for the upcoming issue. Please visit the "Submit Paper" section to learn more. ***
← Back to Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development"

पारधी विकास कार्यक्रम अंतर्गत पारधी आवास योजनेचे अध्ययन

India

Abstract

प्रस्तुत शोधनिबंधामध्ये अमरावती जिल्ह्यातील पारधी विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या 'पारर्थ आवास योजने'चा सामाजिक व आर्थिक दृष्टिकोनातून चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. ब्रिटिशकालीन 'क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट १८७१' च्या वारशाने उपेक्षित, भूमिहीन व शतकानुशतके तात्पुरत्या पालांमध्ये स्थलांतरित जीवन जगणाऱ्या पारधी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा या योजनेचा केंद्रवर्ती उद्देश आहे. अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील ४८ पारधी बेडयांचा आणि १०० प्रातिनिधिक लाभार्थी कुटुंबांच्या सर्वेक्षणाद्वारे या योजनेच्या अंमलबजावणीचे सखोल मूल्यमापन करण्यात आले आहे. या योजनेद्वारे सर्वसाधारण क्षेत्रासाठी रु. १,५८,०००/- तर नक्षलग्रस्त व डोंगराळ भागासाठी रु. १,६८,०००/- थेट अनुदान देऊन पक्के घर, शौचालय (स्वच्छ भारत मिशन), नळ जोडणी (जल जीवन मिशन) आणि मनरेगा मजुरी उपलब्ध करून दिली जाते. घरांची मालकी प्रामुख्याने महिलांच्या किंवा संयुक्त नावे दिल्याने महिला सक्षमीकरणाला गती मिळाली आहे. संशोधनातील निष्कर्षांनुसार, पक्का निवारा मिळाल्यामुळे समाजाचे पारंपरिक स्थलांतर लक्षणीयरीत्या घटले असून मुलांच्या शिक्षणात व कुटुंबाच्या सामाजिक दर्जात सकारात्मक स्थैर्य आले आहे. मात्र, नमुना ८-अ (जागेची अनुपलब्धता), शासकीय पट्ट्‌यांच्या वितरणातील प्रशासकीय संथ गती, निरक्षरता व ऑनलाइन प्रक्रियेतील अनभिज्ञता यामुळे १००% गरजूंना योजनेचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. यावर मात करण्यासाठी विशेष पट्टे वाटप शिबिरे, अनुदानात किमान रु. २.५० ते ३.०० लाखांपर्यंत वाढ, 'स्मार्ट व्हिलेज क्लस्टर मॉडेल' आणि एक खिडकी पद्धत राबविण्याची नहत्त्वपूर्ण शिफारस या शोधनिबंधात करण्यात आली आहे.

How to Cite This Article

विशाल मोकाशे,डॉ. दिपक शृंगारे. (2026). पारधी विकास कार्यक्रम अंतर्गत पारधी आवास योजनेचे अध्ययन. Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development".

Rights

Copyright
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE