भारतीय अर्थव्यवस्थेचे हरित संक्रमण : शाश्वत वाहतूक क्षेत्र एक आर्थिक अध्ययन
India
Abstract
भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासाबरोबरच वाहनसंख्या आणि वाहतूक मागणीत सातत्याने वाढ झाल्यामुळे देशाचा ऊर्जा वापरही वाढला आहे. या संदर्भात आर्थिक वाढीसोबत पर्यावरणीय शाश्वतता, ऊर्जा सुरक्षा आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर साध्य करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेचे हरित संक्रमण आवश्यक ठरते. वाहतूक क्षेत्र हे आर्थिक विकास, सेवांच्या हालचाली, बाजारपेठांशी संपर्क आणि वस्तू व रोजगारनिर्मितीसाठी महत्त्वाचे असले, तरी पारंपरिक जीवाश्म इंधनाधारित वाहतुकीमुळे कार्बन उत्सर्जन, वायुप्रदूषण, इंधन आयात आणि ऊर्जा-अवलंबित्व यांसारख्या समस्या निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर स्वच्छ इंधन, इलेक्ट्रिक वाहने, सार्वजनिक वाहतूक आणि अक्षय ऊर्जेवर आधारित चार्जिंग व्यवस्था हे हरित संक्रमणाचे महत्त्वपूर्ण घटक ठरतात. प्रस्तुत संशोधन पेपर मध्ये दुय्यम माहितीच्या आधारे वर्णनात्मक, तुलनात्मक व प्रवृत्ती-आधारित आर्थिक विश्लेषणच्या आधारे वाहतूक क्षेत्रातील तांत्रिक नवोन्मेष, EV स्वीकार, ऊर्जा वापर, आर्थिक वाढ आणि शाश्वत विकास यांच्यातील परस्परसंबंधाचा अभ्यास करण्यात आला आहे. सदर अभ्यासाच्या निष्कर्षातून असे दिसून येते की हरित वाहतूक भारताच्या ऊर्जा सुरक्षा, रोजगारनिर्मिती, तांत्रिक नवोन्मेष, आयात-निर्भरता कमी करणे आणि कमी-कार्बन विकासाला चालना देऊ शकते. त्यामुळे चार्जिंग पायाभूत सुविधा, सार्वजनिक वाहतूक, स्वदेशी बॅटरी उत्पादन, अक्षय ऊर्जा आणि सर्वसमावेशक हरित गतिशीलतेमध्ये अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. करिता सदर लेखामध्ये “भारतीय अर्थव्यवस्थेचे हरित संक्रमण : शाश्वत वाहतूक क्षेत्र एक आर्थिक अध्ययन” याचे विश्लेषण केलेले आहे.
Keywords
How to Cite This Article
Rights
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE