सोलापूर जिल्ह्यातील पावसावर अवलंबून असलेल्या शेतीवर हवामान बदलाचा परिणाम: एक अभ्यास
India
Abstract
देशातील विविध प्रदेशांमध्ये हवामान बदलाच्या परिणामांचा अनेक अंगांनी अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासांमधून असे दिसून येते की, देशातील इतर क्षेत्रांच्या तुलनेत शेतीवर हवामान बदलाचा मोठा परिणाम होतो. दुष्काळासारख्या हवामानविषयक बदलांचा पावसावर अवलंबून असलेल्या पिकांच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो, असे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. पावसावर अवलंबून असलेल्या शेतीतील पिकांच्या उत्पादनात घट होणे आणि निव्वळ उत्पन्न कमी होणे, यांसारखे परिणाम शेतकर्यांच्या अनुभवातून समोर आले आहेत. हवामानातील बदलांशी जुळवून घेण्यासाठी शेतकरी तांत्रिक उपाययोजना स्वीकारत आहेत. दुसरीकडे, काही शेतकरी शेतीव्यतिरिक्त इतर व्यवसायांकडे वळत आहेत. लहान आणि मध्यम शेतकरी हवामान बदलाच्या परिणामांना अधिक असुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. तसेच, हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी या शेतकर्यांकडून मोठ्या शेतकर्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात विविध उपाययोजना स्वीकारल्या जात आहेत. हवामान बदलाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने, उत्पादन व उत्पन्नातील घट यांसारखे अल्पकालीन परिणाम आणि शेतकर्यांनी शेती व्यवसाय सोडणे यांसारखे दीर्घकालीन परिणाम टाळण्यासाठी शासनाने योग्य धोरणात्मक उपाययोजना लवकरात लवकर करणे आवश्यक आहे.
Keywords
How to Cite This Article
Rights
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE