विदर्भ आणि मराठवाड्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतील प्रादेशिक असमतोल आणि विकासाच्या संधी
India
Abstract
प्रस्तुत संशोधन प्रबंधात महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा या दोन प्रमुख विभागांच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतील प्रादेशिक असमतोलाचा आणि शाश्वत विकासाच्या नवीन संधींचा चिकीत्सक अभ्यास करण्यात आला आहे. महाराष्ट्र हे आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्य असले तरी, औद्योगिक केंद्रीकरण आणि विकासाचे फायदे प्रामुख्याने मुंबई-पुणे-नाशिक या पट्ट्यापुरतेच मर्यादित राहिल्याने राजंतर्गत तीव्र विषमता निर्माण झाली आहे. द्वितीयक माहितीच्या आधारे केलेल्या या संशोधनातून असे दिसून येते की, विदर्भ व मराठवाड्यातील सिंचनाचा प्रचंड अनुशेष, कोरडवाहू शेतीवरील अति-अवलंबित्व, कृषी-प्रक्रिया उद्योगांची वानवा आणि पायाभूत सुविधांचा संथ विकास ही येथील ग्रामीण अर्थव्यवस्थे मागील प्रमुख कारणे आहेत. या असमतोलामुळे ग्रामीण भागात कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या आणि रोजगारासाठी होणारे स्थलांतर यांसारख्या गंभीर समस्या उद्भवल्या आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रस्तुत प्रबंधात शाश्वत ग्रामीण विकासाच्या विविध संधींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक पातळीवर कृषी-प्रक्रिया उद्योग उभारणे, सौर ऊर्जेचा वापर करून दिवसा वीजपुरवठा करणे, जैविक शेती, कृषी-पर्यटन आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून दुग्धव्यवसायाचा विस्तार करणे यांसारख्या उपाययोजना सुचवल्या आहेत. समृद्धी महामार्गासारख्या नव्या पायाभूत सुविधांचा लाभ घेऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला जागतिक बाजारपेठेशी जोडल्यास हा प्रादेशिक असमतोल यशस्वीपणे दूर केला जाऊ शकतो, हा निष्कर्ष या संशोधनातून मांडण्यात आला आहे.
Keywords
How to Cite This Article
Rights
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE