editor@bjddjournal.org +91 8600071634, +91 98903 82132
Open-Access, Transparent Peer-Reviewed, Refereed

BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE

ISSN: 3139-1486 (Online) | ISSN: 3139-9819 (Print) Impact Factor : 6.21 ESTD Year : 2025
Bi-monthly Multilingual Academic Research Multidisciplinary

*** Important Announcement: Call for Papers! Submissions are now open for the upcoming issue. Please visit the "Submit Paper" section to learn more. ***
← Back to Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development"

दारिद्रय, असमानतेचे निर्मुलन आणि सर्वसमावेशक विकासात सामाजिक न्यायाची भूमिका – एक अभ्यास

India

Abstract

दारिद्र्य व असमानतेचे निर्मूलन होणे हे देशाच्या हितासाठी अत्यंत आवश्यक आहे. दारिद्र्य फक्त आर्थिक टंचाईमुळेच निर्माण होते असे नाही तर अनेक प्रकारच्या संधी नाकारल्यामुळे देखील दारिद्र्य निर्माण होत असते. भारतीय संविधानाच्या माध्यमातून दारिद्र्य आणि असमानता या घटकाला कायदेशीर हद्दपार करण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे, दारिद्र्य आणि संधीची समानता नाकारणे या आधारावर शोषण होताना दिसत आहे, त्यासाठीच सामाजिक न्यायाच्या तत्वाच्या माध्यमातून दारिद्र्य आणि असमानतेचे निर्मूलन करणे काळाची गरज आहे. सामाजिक न्यायाच्या माध्यमातून सर्व समाजाला विकासाच्या प्रक्रियेमध्ये आणणे, सर्वांना समानसंधी बहाल करणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि सर्व समावेशक विकास साध्य करणे हाच खरा सामाजिक न्यायाचा उद्देश आहे.विकासाच्या संकल्पना देशाच्या हितासाठी आणि देशांतर्गत नागरिकांसाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे. त्यामुळेच देशांमध्ये जे विषमतावादी तत्त्व आहेत त्यांना हद्दपार करणे आणि देशाला मुख्य विकासाच्या प्रक्रियेमध्ये आणणे हाच खरा मुख्य उद्देश सामाजिक न्यायाचा आपणास दिसतो. संविधानिक अधिकाराच्या माध्यमातून दारिद्र्य निर्मूलन व असमानतेच्या तत्वाचे उच्चाटन आणि देशाच्या अंतर्गत सर्व जाती, धर्माच्या, पंथाच्या, भाषेच्या लोकांचा विकास साध्य करणे हेच खरे राजकीय व्यवस्थेचे कर्तव्य असायला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय प्रस्थापित करता येईल. वरील संशोधन लेखाच्या माध्यमातून दारिद्र्याची संकल्पना व असमानतेचे तत्व आणि सर्वसमावेशक विकास या दृष्टिकोनातून चिकित्सक पद्धतीने विषयाची मांडणी केली आहे.

How to Cite This Article

प्रा. ई. एस. गेडाम. (2026). दारिद्रय, असमानतेचे निर्मुलन आणि सर्वसमावेशक विकासात सामाजिक न्यायाची भूमिका – एक अभ्यास. Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development".

Rights

Copyright
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE