editor@bjddjournal.org +91 8600071634, +91 98903 82132
Open-Access, Transparent Peer-Reviewed, Refereed

BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE

ISSN: 3139-1486 (Online) | ISSN: 3139-9819 (Print) Impact Factor : 6.21 ESTD Year : 2025
Bi-monthly Multilingual Academic Research Multidisciplinary

*** Important Announcement: Call for Papers! Submissions are now open for the upcoming issue. Please visit the "Submit Paper" section to learn more. ***
← Back to Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development"

भारतातील हरित अर्थव्यवस्था आणि शाश्वत आर्थिक विकास: हवामान बदलाच्या संदर्भातील एक विश्लेषणात्मक अभ्यास

India

Abstract

सदर संशोधनामध्ये भारतातील हरित अर्थव्यवस्थेचा विकास, शाश्वत आर्थिक विकासातील तिचे योगदान आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक व पर्यावरणीय आव्हानांचा सांख्यिकीय व विश्लेषणात्मक अभ्यास करण्यात आला आहे. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत औद्योगिकीकरण, शहरीकरण, वाढती ऊर्जा मागणी आणि नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर यांमुळे पर्यावरणावर ताण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक प्रगती आणि पर्यावरण संरक्षण यांच्यात समतोल साधण्यासाठी हरित अर्थव्यवस्थेची संकल्पना महत्त्वपूर्ण ठरते. या संशोधनाचा प्रमुख उद्देश भारतातील हरित अर्थव्यवस्थेची प्रगती तपासणे, शाश्वत आर्थिक विकासातील तिची भूमिका स्पष्ट करणे आणि हवामान बदलाचा कृषी, ऊर्जा, रोजगार व नैसर्गिक संसाधनांवर होणारा संभाव्य परिणाम अभ्यासणे हा आहे. तसेच नवीकरणीय ऊर्जेचा विस्तार, वनसंवर्धन, प्रदूषण नियंत्रण, शाश्वत शेती आणि हरित रोजगारनिर्मिती यांचे महत्त्व विशद करणे हा या अभ्यासाचा उद्देश आहे प्रस्तुत संशोधनासाठी 2015 ते 2025 हा कालावधी विचारात घेण्यात आला आहे. संशोधनासाठी वर्णनात्मक, विश्लेषणात्मक आणि तुलनात्मक संशोधन पद्धतींचा वापर करण्यात आला असून माहितीचे संकलन दुय्यम स्रोतांद्वारे करण्यात आले आहे. यामध्ये भारत सरकारचे आर्थिक सर्वेक्षण, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, भारतीय वन सर्वेक्षण, नीती आयोग तसेच संबंधित अधिकृत अहवाल व सांख्यिकीय आकडेवारीचा आधार घेतला आहे. उपलब्ध आकडेवारीचे तक्ते, टक्केवारीतील बदल आणि कालानुक्रमिक तुलनेच्या साहाय्याने विश्लेषण करण्यात आले आहे. हरित अर्थव्यवस्थेच्या विकासामुळे स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढविणे, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे, प्रदूषण कमी करणे आणि नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करणे शक्य होऊ शकते. तथापि, हरित तंत्रज्ञानाचा खर्च, वित्तपुरवठ्याच्या मर्यादा, कौशल्यांचा अभाव आणि हवामान बदलाचे वाढते परिणाम ही महत्त्वाची आव्हाने आहेत. त्यामुळे शासकीय धोरणांची प्रभावी अंमलबजावणी, संशोधन व तंत्रज्ञानातील गुंतवणूक आणि जनसहभाग आवश्यक आहे. एकंदरीत, हरित अर्थव्यवस्था ही भारताच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण साधन ठरू शकते. आर्थिक प्रगती, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक समावेशकता यांचा समन्वय साधल्यास भारताला दीर्घकालीन व शाश्वत विकासाच्या दिशेने पुढे जाता येईल.

Keywords

हरित अर्थव्यवस्थाशाश्वत आर्थिक विकासहवामान बदलनवीकरणीय ऊर्जापर्यावरण संरक्षणहरित रोजगारनैसर्गिक संसाधने.

How to Cite This Article

जयश नरसिंगराव मुत्यालवार. (2026). भारतातील हरित अर्थव्यवस्था आणि शाश्वत आर्थिक विकास: हवामान बदलाच्या संदर्भातील एक विश्लेषणात्मक अभ्यास. Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development".

Rights

Copyright
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE