भारतातील मानवी भांडवल निर्मितीत शिक्षण व आरोग्य विषयक सोयी-सुविधांची भूमिका
India
Abstract
मानवी भांडवल निर्मिती ही आर्थिक विकासाची एक मूलभूत प्रक्रिया असून, शिक्षण आणि आरोग्यविषयक सोयी-सुविधा हे तीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. भौतिक भांडवलाच्या तुलनेत मानवी भांडवलामध्ये व्यक्तीचे ज्ञान, कौशल्ये, शारीरिक क्षमता, मानसिक स्वास्थ्य, कार्यक्षमता आणि उत्पादकता यांचा समावेश होतो. भारतासारख्या विपूल लोकसंख्येच्या आणि विकसनशील अर्थव्यवस्थेसाठी शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक ही केवळ सामाजिक कल्याणाची बाब नसून दीर्घकालीन आर्थिक वृद्धी, रोजगारनिर्मिती, उत्पन्नवाढ आणि आर्थिक विषमता कमी करण्यासाठी आवश्यक असलेली उत्पादक गुंतवणूक मानली जाते. प्रस्तुत संशोधन लेखात भारतातील मानवी भांडवल निर्मितीमध्ये शिक्षण व आरोग्य सुविधांचे योगदान अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासण्यात आलेआहे. यासाठी भारत सरकारचे आर्थिक सर्वेक्षण २०२५–२६, शालेय शिक्षणावरील UDISE+ २०२४–२५ अहवाल, राष्ट्रीय आरोग्य लेखा २०२१–२२, श्रमबल सर्वेक्षण २०२३–२४ आणि ASER २०२४ यांसारख्या दुय्यम स्रोतांचा वापर करण्यात आला आहे. प्रस्तुत संशोधन लेखातून असे दिसून येते की, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील खर्चाचे मूल्यमापन केवळ पायाभूत सुविधांच्या संख्येवर न करता, त्यातून निर्माण होणारे प्रत्यक्ष शैक्षणिक परिणाम, आरोग्यस्थिती, कौशल्यविकास आणि उत्पादकतेतील वाढ यांच्या आधारे केले पाहिजे. भारताच्या शाश्वत व सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि स्वस्त व सहज उपलब्ध आरोग्यसेवांमध्ये समन्वित, सातत्यपूर्ण आणि न्याय्य गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे.
Keywords
How to Cite This Article
Rights
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE