editor@bjddjournal.org +91 8600071634, +91 98903 82132
Open-Access, Transparent Peer-Reviewed, Refereed

BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE

ISSN: 3139-1486 (Online) | ISSN: 3139-9819 (Print) Impact Factor : 6.21 ESTD Year : 2025
Bi-monthly Multilingual Academic Research Multidisciplinary

*** Important Announcement: Call for Papers! Submissions are now open for the upcoming issue. Please visit the "Submit Paper" section to learn more. ***
← Back to Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development"

केंद्र व राज्य शासनाच्या वनउपज व आदिवासी विकासासंदर्भातील योजनांचा अभ्यास

India

Abstract

भारत हा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध देश असून वने, जलसंपत्ती, खनिजे, जैवविविधता आणि विविध वनउपज ही देशाच्या आर्थिक विकासाची महत्त्वपूर्ण साधने आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत वनसंपत्तीला पर्यावरणीय संतुलनासोबतच ग्रामीण व आदिवासी समुदायांच्या उपजीविकेच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्र राज्यात सह्याद्री, सातपुडा आणि विदर्भातील विस्तृत वनक्षेत्रांमुळे साग, बांबू, तेंदूपत्ता, मध, लाख, डिंक व विविध गौण वनउपज उपलब्ध होतात. या नैसर्गिक संसाधनांवर राज्यातील अनेक आदिवासी कुटुंबांची उपजीविका, रोजगार आणि उत्पन्न अवलंबून आहे. तथापि, वनउपजाचे मर्यादित बाजारमूल्य, मध्यस्थांचे वर्चस्व, प्रक्रिया उद्योगांचा अभाव आणि विपणनातील अडचणी यांमुळे या संसाधनांपासून अपेक्षित आर्थिक लाभ मिळण्यात मर्यादा येतात. या पार्श्वभूमीवर केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या वनहक्क कायदा, पेसा कायदा, वनधारित रोजगार, गौण वनउपज खरेदी आणि आदिवासी विकास योजनांचा अभ्यास करून वनसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि आदिवासी समुदायाचा सर्वांगीण आर्थिक व सामाजिक विकास साध्य होणे अभिप्रेत आहे. महाराष्ट्रामध्ये आदिवासी हा समुदाय सांस्कृतिक विविधता परंपरागत ज्ञान आणि या सोबतच निसर्गाशी जवळीक असल्या कारणाने नैसर्गिक संसाधानाशी समर्पित असणारे जीवन या गोष्टींसाठी पूर्वीपासूनच ओळखला जातो. दाट जंगल, दुर्गम डोंगररांगा, मर्यादित पायाभूत सुविधा आणि पारंपरिक शेती यांवर आधारित जीवनमानामुळे या समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. आरोग्य सेवा अपुरी, शैक्षणिक मागासलेपण,अपुरा रोजगार, वनहक्कांचे प्रश्न आणि बाजारपेठांपर्यंत पोहोच नसणे ही येथे मुख्य आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य शासनाने आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनेक योजना व प्रकल्पांची अंमलबजावणी केली आहे. केंद्र शासनाच्या वनबंधू कल्याण योजना, MFP-MSP (वनउपज किमान समर्थनभाव) योजना, वन हक्क योजना कायदा, वन धन योजना, आदिवासी महिला साक्षमिकरण पंतप्रधान आदिवासी उन्नत ग्राम विकास योजना यांसारख्या उपक्रमांनी आर्थिक सुरक्षा, यांना बळकटी प्रदान केली आहे. राज्य शासनानेही आदिवासी उपयोजना (TSP), जंगलहक्क कायदा अनुदान योजना, महिला सक्षमीकरण योजना आणि वनउपज मूल्यवर्धन कार्यक्रम यांद्वारे आदिवासी समाजाच्या विकासासाठी लक्ष केंद्रित केले आहे. एकंदरीत वनआधारित अर्थव्यवस्था ही आदिवासी समुदायाच्या सर्वांगीण आर्थिक व सामाजिक विकासाची महत्त्वपूर्ण आधारशिला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, वनहक्क कायदा, पेसा कायदा, गौण वनउपजासाठी किमान आधारभूत किंमत, वनधन विकास केंद्रे, रोजगारनिर्मिती आणि आदिवासी महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांमुळे आदिवासी समाजाच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाल्या आहेत. तथापि, या योजनांचे वास्तविक यश प्रभावी अंमलबजावणी, निधीचा पारदर्शक व परिणामकारक वापर, वनउपजाचे मूल्यवर्धन, बाजारपेठेतील थेट सहभाग आणि स्थानिक समुदायाच्या निर्णयप्रक्रियेतील सक्रिय सहभाग यांवर अवलंबून आहे. त्यामुळे आदिवासी समाजाला केवळ शासकीय योजनांचा लाभार्थी न मानता नैसर्गिक साधनसंपत्तीचा संरक्षक, उत्पादक आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा सक्रिय घटक म्हणून सक्षम करणे आवश्यक आहे. वनसंपत्तीचे शाश्वत संवर्धन, आर्थिक लाभांचे न्याय्य वितरण आणि शिक्षण, आरोग्य, रोजगार व महिला सक्षमीकरण यांचा समन्वय साधल्यास आदिवासी समुदायाचा सर्वसमावेशक,आणि शाश्वत विकास साध्य होऊ शकतो, हा प्रस्तुत संशोधनाचा प्रमुख हेतू आहे.

Keywords

आदिवासी समाजवनउपजकौशल्य प्रशिक्षणशाश्वत विकासपेसा

How to Cite This Article

मयूर पंजाबराव राऊत,डॉ.लक्ष्मण रा. म्हस्के. (2026). केंद्र व राज्य शासनाच्या वनउपज व आदिवासी विकासासंदर्भातील योजनांचा अभ्यास. Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development".

Rights

Copyright
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE